
प्रत्येक जिल्ह्यातून बेलदार समाजाचे जिल्हा प्रतिनिधी आणि प्रत्येक तालुक्यातून तालुका प्रतिनिधी 2 समाजासाठी वेळ देणारे माहिती संग्रह करणारे सदस्य हवेत 7775932537 माझ्या व्हाट्सअप नं.वर आपले नाव पत्ता पाठवावा.
महत्त्वाचे
- Home
- ACCURATE TIME IN INDIA.
- zoom चा आनंद आणि आशच्गर्य तुमीच अनुभवा.
- जगातल्या REDIO STATION ना पाहूण सुंदर गाणी ऐका.
- आपल्या डोळ्याचे कार्य पाहा 3D IMAGE मध्ये..⬇
- वजन कमी करायचे येथे मिळतो free diet चार्ट..
- भारतातील कुठलाही पिन कोड शोधा.
- मतदार यादीमध्ये ऑनलाईन नाव add करणे
- मतदार यादीतील नाव दुरुस्त करणे
- Jab पाहिजे येथे पाहा
Saturday, April 28, 2018
ओड्र-(ओड) शब्द कसा आला

ओड्र- समाजालाच वड्ड, असेही म्हटले जाते. ही हिंदु धर्मातील मूळची क्षत्रिय जमात आहे. ओड किंवा ओड्र (Od किंवाOdra) या शब्दाचा अपभ्रंश होवून वड्ड हा शब्द अस्तित्वात आला आहे. ओड्र या शब्दाचे मूळ शोधणे फार कठीण आहे. संस्कृत शब्द उंड पासून उंड्र नंतर ओड्र हा शब्द तयार झाला व पुढे ओड्र पासून ओड-ओढ-वड्ड-असा विस्तार होत गेला असा एक विचार प्रवाह आढळून येतो. संस्कृत मध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो. सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’ आणि ‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा ’जमिनीवरील समाज’ (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे. उंड्र या शब्दाच्या पर्यायाने विचार करता उडून आलेली धूळ असा म्हणजेच स्थलांतरित भूमिपुत्र असा घेता येऊ शकेल. ओडिसा या राज्याच्या नांवाची उत्पत्ती ओड्र विषय (Odra-Vishaya) / ओड्रदेश या संस्कृत शब्दांपासून झालेली आहे. ओडवंशीय राजा ओड्र याने ओडिसा हे राज्य वसविले. पाली आणि संस्कृत भाषेत ओड्र लोकांचा उल्लेख क्रमशः ओद्दाक आणि ओड्रच्या रूपात आढळून येतो. प्लिनी आणि टोलेमी सारख्या युनानी लेखकांनी ओड्र लोकांचे वर्णन ओरेटस (Oretes) असा केला आहे. प्लिनीच्या प्राकृतिक इतिहासात ओरेटस (Oretes) लोक जेथे राहतात तेथे मलेउस (maleus) पर्वत उभा आहे. येथे युनानी शब्द ओरेटस बहुधा संस्कृतमधील ओड्र या शब्दाचे संस्करण असून, मलेअस पर्वत हा ओडिसामधील मलयागिरी आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment