प्रत्येक जिल्ह्यातून बेलदार समाजाचे जिल्हा प्रतिनिधी आणि प्रत्येक तालुक्यातून तालुका प्रतिनिधी 2 समाजासाठी वेळ देणारे माहिती संग्रह करणारे सदस्य हवेत 7775932537 माझ्या व्हाट्सअप नं.वर आपले नाव पत्ता पाठवावा.
बेलदार आहे मी तळपती तलवार आहे मी प्रेषितांनो आता थोडासा गुन्हा करणार आहे मी..
आमचा DNA एक आहे आमचं रक्त एक आहे शत्रुलाही मनगटाच्या जोरावर पराभूत करणारे आम्ही आहोत
आम्ही लढावय्ये आहोत
मोठमोठ्या राज्ये आमच्या मनगटाच्या बळावर निर्माण झाली मोठमोठी राज्ये आम्ही लयाला घातली
जेवढे पराक्रमी तेवढेच प्रामाणिक आहोत
पूर्ण इतिहासात एकही बेलदार फितूर झाला किंवा शत्रूला जाऊन मिळाला असे एकही उदाहरण नाही
तेवढेच आम्ही संयमी आणि नम्र आहोत कुणालाही आम्ही त्रास दिला नाही तसे वागलो नाही याची साक्ष इतिहास देतो
आजही कुठेही अन्याय झाला तरी आमचं रक्त सळसळत...कारण अन्यायाशी तडजोड करणे हा आमचा पिंडच नाही..
काळाच्या प्रवाहात आम्ही आपण वेगवेगळ्या उपजातीमध्ये वेगळे झालो किंवा काही स्वार्थी लोकांनी आपल्या सोयीसाठी हवे तसे कायदे बनविले हव्या तश्या उपजाती निर्माण केल्या आपण दूर झालो कायमचे..
कुठल्याच मोठ्या राजकीय संघटनेन आपल्याना एकत्र आणण्याचं काम मनापासून केलं नाही.. आमच्या आश्रयाने संघटना उभ्या राहिल्या..आपण असेच आपल्याच जात भावाशी जुळवून घेतले नाही..तर आता आपण टिकणे नाही आम्ही कधीच एकत्र येऊन एकीच्या बळावर लढलो नाही.. तर तर आता टिकणं नाही शक्य...आपल्या पापाची आपल्या अश्या फुटीरतेची फळं आपली मुलं भोगत आहे
अंध कुना म्हणावे ज्यास उघडही न दिसे सन्मार्ग ज्यास
खरा बधिर कोण?
जो नाही परीसत खऱ्या हितोपदेशास....
आता प्रयन्त आपण डोळे असूनही आंधळ्या
सारखे वागलो कान असूनही बधिर बनलो काळाची गरज ओळखा....आणि आता तरी एकत्र या....
आमचा इतिहास एक आहे..आम्ही संख्येने ही खूप आहोत आमचा DNA एक आहे चला तर एक दिलाने एका मनाने एक हृदयाने एकत्र येवून हक्क मागूयात.. बेलदार आहे मी तळपती तलवार आहे मी प्रेषितांनो आता थोडासा गुन्हा करणार आहे मी.....
No comments:
Post a Comment